शिवाजीमहाराजांची वाघनखं लंडनहून आणणारं हे चांगलंच, पण त्याबरोबर लंडनचं ‘म्युझियम कल्चर’ आणणार का? तसं झालं तर ते अधिक उत्तम होईल...
इतिहास जतन करून ठेवणारी जागतिक दर्जाची वस्तुसंग्रहालयं कशी उभारावी, इतिहास कसा जपावा आणि रंजक पद्धतीनं जगापुढे कसा मांडावा, याचा धडा आपण घेणार का? आपल्या देशात हे ‘म्युझियम कल्चर’ रुजवण्यासाठी आपण लंडनकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. परदेशात गेल्यावर पैसे खर्च करून संग्रहालय बघणारे किती भारतीय देशातील वस्तुसंग्रहालय बघायला जातात? लंडनमधील वस्तुसंग्रहालय बघताना आपण कुठे कमी पडतो, हे कळतं.......